वय वर्ष ७७ , हातात भगवा झेंडा, डोक्यावर कोल्हापुरी फेटा, तरुणांनाही लाजवेल एवढ्या खणखणीत आवाजात "छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी जय जिजाऊ, जय शंभू राजे’ अशा घोषणा देत फक्त शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी या आजीबाईंनी रायगडची पायी स्वारी केली.